हर्सूलमध्ये महिलेला चाकूने भोसकले

Foto

औरंगाबाद: किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणावरून शेजाऱ्याने २३ वर्षीय महिलेच्या पोटात चाकू भोसकल्याची घटना आज पहाटे साडेचार वाजेच्या दरम्यान  हर्सूल भागात घडली.जखमी महिलेवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

तबस्सुम इलियास खाटीक वय-२३ वर्ष( टी पॉइंट, हर्सूल) असे जखमी महिलेचे नाव आहे.

खाटीक यांचे शेजारी राहणाऱ्या परिवारासोबत वाद होता.आज पहाटे दोन्ही परिवारात हमरीतुमरी झाला.  त्यानंतर वाद विकोपाला गेला व शेजरी राहणाऱ्या व्यक्तीने धारदार चाकू ने महिलेच्या पोटावरवार केले. महिलेवर शासकीय घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.सकाळी हर्सूल पोलिसांनी जखमी महिलेचा जबाब नोंदविला आहे.मात्र दुपारपर्यंत आरोपीचे नाव कळाले न्हवते, व गुन्हा दाखल झालेला न्हवता अधीक तपास हर्सूल पोलीस करीत आहेत.